बॉलिवूड अभिनेते शशी कपूर यांच्या निधनामुळे दु:खी झालेले अमिताभ बच्चन आपल्या जिगरी मित्रासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाची आठवण करत आहेत. अनेक चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले. अमिताभ यांनी टि्वटरवर ‘शशीसाठी तुमच्या बबुआकडून...’ असा एक ब्लॉग लिहिला आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, शशी कपूर अमिताभ यांना प्रेमाने ‘बबुआ’ म्हणून संबोधित करत. बिग बी यांनी आपल्या ब्लॉगची सुरुवात रूमी जाफरी यांच्या एका शेरने केली... ‘हम जिंदगी को अपनी कहां तक संभालते इस कीमती किताब का कागज खराब था’ अमिताभ यांनी लिहिले, "मला जेव्हा माझ्या जिगरी मित्राच्या निधनाविषयी कळले, तेव्हा मी रुग्णालयात गेलो नाही. मी फक्त एकदाच त्यांना भेटायला रुग्णालयात गेलो होतो. त्यानंतर कधीच गेलो नाही. मी माझ्या मित्राला अशा अवस्थेत पाहू इच्छित नव्हतो." कारकिर्दीच्या सुरुवातीला अमिताभ आणि शशी कपूर यांच्या जोडीने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अशाच एका सुपरहिट ‘दीवार’ चित्रपटातील अमिताभ आणि शशीकपूर यांचा एक डायलॉग ‘मेरे पास मां है’ खूपच प्रसिद्ध झाला होता. शशी यांच्या निधनामुळे दु:खी झालेल्या अमिताभ यांनी हा संवाद आठवत लिहिले की, ‘अब मेरे पास भाई नहीं है.’
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews